Dry Leaves are a resource, not waste..
- Swaroopa Chandorkar
- Apr 21, 2017
- 1 min read
Brown leaves for the green plants. This blog by Swaroopa Chandorkar explains how to use dry leaves for healthy soils and healthy plants...
*पालापाचोळ्याचा उपयोग*
सध्याच्या उन्हात झाडांना अतिशय त्रास होतोय. त्यामुळे सर्वांनीच आपापल्या झाडांच्या मुळाशी पालापाचोळा घालून खत-माती झाकण्याची आवश्यकता आहे.
उघडी असलेली माती लवकर कोरडी पडते, आणि तापत राहते. तापलेल्या मातीत पाणी घातले की शिजण्याची प्रक्रिया सुरू होते, याचा थेट परिणाम झाडांच्या मुळांवर होतो. अशा वेळी झाडांना श्वास घेण्यासही त्रास होतो.
आपण पाणी घातल्या नंतर उन्हामुळे बाष्पीभवन होऊन पाणी उडूनही जाते. वरून झाडे सुकत जातात आणि शेवटी फक्त काठ्या शिल्लक राहतात म्हणजेच झाडे मरतात. आपल्याला नेमके कारणही समजत नाही.
या सर्व समस्यांवर सोपा, स्वस्त आणि नैसर्गिक उपाय म्हणजे *पालापाचोळा*.
साधारण नोव्हेंबर पासून पानगळीला सुरवात होते. काही जण तर हा पाला चक्क जाळतात, काही जण कचऱ्यात टाकतात. आपण त्याचा आपल्या सुंदर बागेसाठी छान उपयोग करू शकतो. आणि हा पालापाचोळा सर्वत्र मोफत उपलब्ध असतो.
आसपासच्या मोठी झाडे असलेल्या सोसायट्यांमध्ये, बंगल्यांमध्ये सहज मिळतो. मनपाचे रस्ते सफाई करणारे कर्मचारी सुद्धा सांगितल्या नंतर पोती भरून ठेवतात.
हा पाला फक्त झाडांच्या मुळाशी पसरवून घालावा (mulching), त्यावर पाणी घालावे.हळूहळू खालच्या पाल्याचे खत तयार होत राहते. पुन्हा वर पाला घालावा.
पाल्यामुळे झाडांच्या मुळांकडे कायम गारवा राहतो. एखाद्या दिवशी पाणी नाही घातले तरी झाडे टवटवीत राहतात.

या पाल्याचे खत पावसाळ्यात छान तयार होते, झाडांसाठी खूप आवश्यक असते.

Comments